आळंदी -देहूफाटा चौक येथे येथे गेली पंधरा दिवसांपासून सुरू तुंबलेल्या गटाराचे काम स्थानिक नगरसेवक सचिन गिलबिले व माजी नगरसेवक रामदास घुले यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आले आहे.
काही दिवसांपासून गटार तुंबल्याने पाणी साचून रस्त्यावर येत होते. या तक्रारीची दखल आळंदी नगरपरिषदेने वेळोवेळी घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला; परंतु गटार मुख्य रस्त्याच्या मधोमध असल्यामुळे तसेच रस्त्यावरच्या वाहतुकीमुळे दिवसा काम करण्यास अडचणी येत होत्या.
गुरुवारी (दि. 3) रात्री हे काम सुरू करण्यात आले आहे. गटारलाइनचे काम करत असताना काही अडचण आल्यामुळे काम थांबवण्यात आले होते. याबाबत शहर अभियंता संघपाल गायकवाड यांनी नगरसेवक सचिन गिलबिले, माजी नगरसेवक दिनेश घुले यांना कळवले. त्यांनी अडचण दूर करून काम पुन्हा सुरू केले आहे.