नगराध्यक्षा जगनाडे, मुख्याधिकारी झिंजाड यांचे आवाहन
तळेगाव दाभाडे – येथील नगरपरिषद हद्दीत सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्ती प्रतिष्ठापणा केलेल्या ठिकाणी विसर्जन कुंड करावेत. जर या ठिकाणी विसर्जन करणे शक्य झाले नाही, तर नगरपरिषदेने ज्या ठिकाणी मूर्ती संकलन करण्याची केंद्रे उभारून व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी मूर्तीदान करावे, असे आवाहन नगराध्यक्ष चित्रा जगनाडे व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या गणेशोत्सवा संदर्भात जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार गणेशोत्सव साधेपणाने करण्याचे ठरले आहे. त्यानुसार गणेशोत्सव आपण साध्या पद्धतीने साजरा करीत आहोत. त्यानुसार त्याची कार्यवाही व काळजी देखील आपण करोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून घेत आहोत.
मूर्ती संकलन केंद्रे पुढील प्रमाणे : तळेगाव गाव भागासाठी- मारुती मंदिर चौक येथील पै. विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुल, तळेगाव स्टेशन परिसरासाठी गोल ग्राउंड यशवंनगर, फ्रेंड्स ऑफ नेचर कार्यालय यशवंतनगर, संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा, समर्थ विद्यालय या ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आली आहेत .
मूर्ती विसर्जन करण्यासाठी लागणारी अमोनियम बायकार्बोनेट पावडर ही नगर परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये प्राप्त होईल. तसेच अधिक माहितीसाठी तळेगाव स्टेशन विभागासाठी आरोग्य निरीक्षक मयूर मिसाळ 9011442160 आणि गाव विभागासाठी आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले 9890821581 यांच्याशी संपर्क साधावा.