भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या कुटुंबात लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. विराट कोहलीने फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.
And then, we were three! Arriving Jan 2021 ❤️🙏 pic.twitter.com/0BDSogBM1n
— Virat Kohli (@imVkohli) August 27, 2020
विराटने ट्विटरवर फोटो शेअर ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, अशी कॅप्शन दिली आहे. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Oh my godddd !! Congratulationssssss 😘😘😘❤️❤️
— Rakul Singh (@Rakulpreet) August 27, 2020
विराट आणि अनुष्का इटलीमध्ये ११ डिसेंबर २०१७ साली विवाहबंधनात अडकले होते. यानंतर सोशल मीडियावर विराट-अनुष्काच्या विवाहाचे फोटो अनेक दिवस व्हायरल झाले होते.