जमैका – जगातील सर्वात वेगवान धावपटू व जमैकाचा अव्वल खेळाडू उसेन बोल्ट याला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आपला 34 वा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या सोहळ्यातच त्याला ही बाधा झाली आहे. हा सोहळा आयोजित करत असताना सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळण्यात आले नव्हते.
या सोहळावजा पार्टीत बोल्टचे अनेक मित्र उपस्थित होते. त्यात इंग्लंडचा अव्वल फुटबॉलपटू रहिम स्टर्लिंगदेखील उपस्थित होता. बोल्टला बाधा झाल्याने या सर्वांनाच चिंता लागली असून प्रत्येकाने करोना चाचणी केली आहे. दरम्यान, बोल्ट स्वतःहून घरातच विलगीकरणात राहणार आहे.