युनिव्हर्सल बॉसची स्पर्धेतून माघार

जमैका – युनिव्हर्सल बॉस अशी क्रिकेटविश्‍वात ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याने आयपीएल स्पर्धेतून माघार घेतल्याचे संकेत दिले आहेत.

जमैकाचा ऑलिम्पिक पदक विजेता धावपटू उसेन बोल्ट याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेल्या काही खेळाडूंना बोल्टसह करोनाची बाधा झाल्यामुळे गेलही घाबरला असून या वर्षाअखेरपर्यंत कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचेही त्याने सांगितले आहे.

बोल्टला करोना झाल्याचे उघड झाल्यावर गेलनेही करोना चाचणी केली होती. या चाचणीत तो निगेटिव्ह आसल्याचा अहवाल आल्यावरही त्याची भीती कमी झालेली नाही. मात्र, आता या वर्षातील उर्वरित कालावधीतही मी घरातच राहणार असून कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणार नसून घरातच राहणार आहे. मला कुठेही प्रवास करण्याची इच्छा नाही, असे गेलने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.