पुणे -“आज घराघरात आलेल्या नेटफ्लिक्स, ऍमेझॉननं मोठ नुकसान केलंय. ते म्हणजे गणपतीच्या काळात रात्री पिक्चरचे तीन शो. पूर्वी चाळी, वाड्यामध्ये व्हीसीआरवर सगळी मंडळी एकत्र येऊन चित्रपट बघायची. त्याची मजाच वेगळी होती. आज माझ्या चाळीत, माझ्या मंडळासमोर मी आणि माझे मित्र पोतं टाकून “मुळशी पॅटर्न’ पहायला मला सर्वात जास्त मजा आली असती,’ अशी भावना अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवादरम्यान ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले. विनोद सातव यांनी तरडे यांची मुलाखत घेतली. मुलाखतीत पुण्यातील गणेशोत्सवाच्या आठवणी, एक कार्यकर्ता म्हणून घडलेले व्यक्तीमत्व, कलाकार अशा विविध विषयांवर तरडे यांनी मनमोकळेपणाने चर्चा केली.
तसेच गणेशोत्सवादरम्यान देखाव्यासाठी केलेली चोरी, एकमेकांशी केलेली भांडणे याबाबत प्रांजळपणे कबुली देत, त्यातूनच एक व्यक्ती म्हणून घडल्याचेही त्यांनी सांगितले.
महोत्सवातील रविवारचे कार्यक्रम
ट्रस्टतर्फे आयोजित ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवात रविवारी महापौर मुरलीधर मोहोळ यांची मुलाखत होणार आहे. मंडळाच्या ुुु.लहर्रीीरपसरीळ.लो या संकेतस्थळावर सायंकाळी 7.00 वाजता आणि दुपारी 3.30 एबीपी माझावर हा कार्यक्रम पाहता येणार आहे.