जळोची- काल बारामती तालुक्यातील ६९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली.यापैकी ५९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १० जणांचे अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
काल एकूण ५९ व संध्याकाळी १० असे ६९ स्वँब नमुने तपासणीसाठी घेतले होते.त्यापैकी एकूण ५९ स्वँब नमुने निगेटिव्ह आलेले आहेत व १० जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.अशी माहिती आरोग्य विभागाकडून सांगण्यात आली आहे.