पुणे – पुरंदर तालुक्यात (दि. 15) 15 बाधित आढळले आहेत. जेजुरीत एकाचा तर सासवड शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. शहरातील हा पाचवा तर जेजुरीतील दुसरा बळी ठरला आहे.
बाधितांची संख्या 273वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 11 बळी गेले आहेत. सासवड येथून 60 पैकी 50 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात 15 पॉझिटिव्ह तर तर 35 जण निगेटिव्ह आले आहेत. शहरात 10, जेजुरीत 1 तर कोडित बुद्रुक 3, गराडे 1, पिसर्वे 1 असे एकूण 16 पॉझिटिव्ह आहेत. सासवड शहरात (दि. 13) व्यक्ती, (दि. 14) व्यापारी तर (दि. 15) महिलेचा मृत्यू झाला आहे.