रांजणगाव गणपती (प्रतिनिधी) : येथील कोरोनाची साखळी तुटता तुटेनाशी झाली आहे. बुधवारी सकाळी पुन्हा दोन जणांचा कोरोना अहवाल पाँझिटिव्ह आला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. स्नेहल घोडेवार यांनी सांगितले.
रांजणगाव येथील एका बँकेच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे रांजणगाव परिसरात घबराट निर्माण झाली होती. त्यातच आज रांजणगाव येथील एक स्थानिक नागरिक व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे एक वैद्यकीय अधिकारी असे दोन जणांचे कोरोना अहवाल पाँझिटिव्ह आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. स्नेहल घोडेवार यांनी सांगितले.
रांजणगाव येथील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांनी शासनाच्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन सरपंच सर्जेराव खेडकर यांनी केले आहे.