मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘एकेरी’ उल्लेख केल्यामुळे स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआमुळे वाद निर्माण झाला आहे. जोशुआने तिच्या स्टँडअपमध्ये महाराजांच्या अरबी समुद्रातील पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
Jab do kaudi ke lukke gawaar good for nothing types martyrs ka mazak udaakar attention seek karte hain, it’s not ok, nobody should be allowed to mock martyrs, there should be strict laws against making fun of majoritarian faith and our national heroes. https://t.co/U6CHK03PPS
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) July 14, 2020
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी तिच्यावर टीका केली. याच मुद्यावर बॉलीवूडची अभिनेत्री कंगना रणौतने ट्विटरवर नाराजी व्यक्त करत ट्विट केले आहे.
काय म्हणाली कंगना ?
‘समाजात ज्यांना दोन पैशांचीही किंमत नाही आहे, समाजाला ज्यांचा काहीच उपयोग नाही आहे असे लोक शहीदांची खिल्ली उडवतात ते अस करतात फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी मात्र हे योग्य नव्हे. नॅशनल हिरो आणि थोर व्यक्तींची मस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा असणे गरजेचे आहे’, असे ट्विट करत कंगनाने या साऱ्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.