नगर -चैन स्नॅचिंग प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी नवाज रउफ सय्यद यास बुरुडगाव रोड येथील अकोलकर हॉस्पिटल नजिक पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
या गुन्ह्यात त्यास मदत करणारा आरोपी फकीर महंमद देशमुख यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे दोघेही पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.दि. 21 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी वाडियापार्क येथील शिवमंदिराजवळ या आरोपींनी अशोक शंकर सायंबर (रा. रविश रो-हौसिंग, कायनेटिक चौक) यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून नेली होती.
उपविभागीय पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखालील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत भंडाळे, नितीन रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ, पोलीस कर्मचारी गणेश धोत्रे, शाहिद शेख, नितीन शिंदे, विजय हिवाळे, भरत इंगळे, बापूसाहेब गोरे, प्रमोद लहारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.