सातारा – जिल्ह्यात शुक्रवारी 58 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 1601 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 950 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये 46 पैकी 23 रुग्ण सातारा तालुक्यतील आहेत. त्यातही सातारा शहरातील नऊ रुग्णांचा समावेश आहे. शहरातील राधिका रोड परिसरात करोनाचे रुग्ण वाढल्याने भीती अधिक वाढली आहे. जिल्ल्हयातील नियम मोडणाऱ्या लोकांवर कारवाईच्या सूचना केल्या जात असल्या तरीही अजूनही लोक निष्काळजीपणे वागत असल्याचे चित्र दिसत आहे.
करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून कारवाई अधिक कडक करण्याचे मत व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाकडून शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील निकट सहवासातील 41, “सारी’चे 2 आणि प्रवास करुन आलेले 3 अशा एकूण 46 जणांचा अहवाल करोनाबाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या 46 बाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. कराड तालुक्यातील मलकापूर येथील 54 व 47 वर्षीय महिला, वाण्याचीवाडी येथील 62 वर्षीय महिला, बनपुरी कॉलनी येथील 53 वर्षीय पुरुष, धावरवाडी येथील 8 वर्षाचा बालक, यादववाडी येथील 43 वर्षीय पुरुष., खटाव तालुक्यातील निमसोड येथील 33 वर्षीय महिला, 14 वर्षीय बालक, बनपुरी येथील 38 वर्षीय पुरुष, वडूज येथील 34 वर्षीय पुरुष, निढळ येथील 18 वर्षीय तरुण., वाई तालुक्यातील व्याहळी कॉलनी येथील 45 वर्षीय पुरुष.,
सातारा तालुक्यातील जिहे येथील 19 वर्षीय तरुण, 70 वर्षीय महिला, करंडी येथील 70, 65 व 45 वर्षीय महिला, शहरातील राधिका रोड येथील 39, 27, 31 व 48 वर्षीय महिला, गार्डन सिटी येथील 31 वर्षीय पुरुष, करंजे येथील 45, 25, 23 व 56 वर्षीय महिला, भरतगाव येथील 77, 15 व 51 वर्षीय पुरुष, 74, 45 व 44 वर्षीय महिला, बोरगाव येथील 12 वर्षाचा बालक, 44 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला., जावळी तालुक्यातील सरताळे येथील 56 वर्षीय पुरुष, पुनवडी येथील 67 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 7 वर्षाचे बालक, 42, 65, 35 वर्षीय महिला, शिंदेफाटा शिरवळ येथील 25 वर्षीय पुरुष, उमाजी नाईक शिरवळ येथील 14 वर्षाचे बालक, महाबळेश्वर येथील 45 वर्षीय पुरुष,
पाटण तालुक्यातील निगोडे (उमरकांचन) येथील 57 वर्षीय महिला, साईकडे येथील 24 वर्षीय महिला.त्यापूर्वी शुक्रवारी सायंकाळी आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 12 नागरिकांचा अहवाल करोना बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये वाई तालुक्यातील परखंदी येथील 60 वर्षीय महिला, ब्राम्हणवाडी येथील 75 व 27 वर्षीय महिला, ओंकार गार्डन जेजुरीकर कॉलनी येथील 45 वर्षीय पुरुष,
पसरणी येथील 85 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील सरडे येथील 50 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील गोकुळनगर येथील 15 वर्षीय तरुणी, मिरगाव येथील 36 वर्षीय पुरुष, बांबोडे येथील 21 वर्षीय तरुणी, कोयनानगर येथील 85 व 52 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
490 जणांच्या घशातील नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 21, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 44, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 67, ग्रामीण रुग्णालय फलटण येथील 18, कोरेगांव येथील 51, वाई येथील 64, शिरवळ येथील 91, रायगांव येथील 54, पानमळेवाडी येथील 24, मायणी येथील 37, महाबळेश्वर येथील 5, खावली येथील 14 असे एकूण 490 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून एन. सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.