सिंगापूरमध्ये ली सियेन लूंग पंतप्रधानपदी कायम

सिंगापूर – सिंगापूरमध्ये करोनाच्या साथीदरम्यान झालेल्या सर्वसाधारण निवडणूकीमध्ये पंतप्रधान ली सियेन लूंग यांच्या सत्तारुढ पीपल्स ऍक्‍शन पार्टीने आपली सत्ता कायम राखली आहे. मात्र विरोधक वर्कर्स पार्टीने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत संसदेतील 10 जागांवर विजय मिळवला आहे.

पीपल्स ऍक्‍शन पार्टी सिंगापूरमध्ये 1965 पासून सत्तेवर आहे. संसदेतील 93 जागांपैकी 83 जागांवर या पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. एकूण मतदानांपैकी 61.2 टक्के मते या पक्षाने मिळव्ली आहेत. मतांची टक्केवारी 2015 च्या निवडणूकीत 70 टक्के होती. त्यामध्ये घट झाल्याचे आढळून आले आहे.

यंदाची निवडणूक म्हणजे करोनाच्या साथीला पंतप्रधान ली यांनी ज्या पद्धतीने हाताळले, ते पाहता त्यांना कायम ठेवण्याबाबतचे सार्वमत म्हणूनच बघितले गेले आहे. सिंगापूरमध्ये सध्या मोठी मंदी असून विकासदर 7 ते 4 टक्‍क्‍यांदरम्यान आहे. करोनाच्या साथीदरम्यान ज्या थोड्या देशांमध्ये निवडणूका झाल्या, त्यात सिंगापूरचाही समावेश होतो आहे.

या निवडणूकीत विजयी होण्याचा आपल्याला विशेष आनंद नाही, मात्र जनतेने स्पष्ट जनादेश दिला असल्याबद्दल पंतप्रधान ली यांनी समाधान व्यक्‍त केले आहे. त्यांनी विरोधी वर्क्‍सर्स पार्टीचेही अभिनंदन केले आहे. वर्क्‍सर्स पार्टीचे भारतीय वंशाचे सरचिटणीस प्रितम सिंग यांना संसदेतील विरोधीपक्ष नेते म्हणून नियुक्‍त केले जाईल, अशी ग्वाहीही पंतप्रधान ली यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.