मुंबई – अक्षय कुमारने नाशिकमध्ये मार्शल आर्ट अॅकेडमी किंवा निसर्गोपचार केंद्र सुरु करण्याच्या उद्देशानं पाहणी करण्यासाठी दोन दिवस नाशिकजवळ मुक्कामी होता. मात्र हा नाशिक दौरा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
यातच त्याचा नाशिक दौऱ्यामुळे तो चांगलाच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाउनच्या काळात हेलिकॉप्टरला परवानगी व शहर पोलिसांनी दिलेला बंदोबस्त या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
दरम्यान,अक्षयने दोन दिवस पूर्वी केलेल्या नाशिक दौऱ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हेलिकॉप्टरला उतरण्याची परवानगी,टाळेबंदीत रिसॉर्टमधील वास्तव्य यामध्ये काही गैर घडले असेल तर चौकशी केली जाईल,असे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वृत्त माध्यमांना सांगितलं आहे.
ते पुढे म्हणाले की,लॉकडाउनमध्ये सर्वजण रस्ते मार्गे प्रवास करत असताना अक्षय कुमार हेलिकॉप्टरने कसा आला? ग्रामिण हद्दीत आला असताना शहर पोलिसांकडून सुरक्षा कशी? रिसॉर्ट बंद असतानाही प्रवेश कसा मिळाला. असा प्रश्न देखील छगन भुजबळ यांनी केला आहे.