वाघोली (प्रतिनिधी) वाघोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सकाळी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात लोकाभिमुख नेता म्हणून दाभाडे यांची कारकीर्द विशेष उल्लेखनीय आहे. सध्या भाजप मध्ये असलेले दाभाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात का प्रवेश केला आहे. हे मात्र गूढ अजूनही अनाकलनीय आहे. दाभाडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपची ताकद वाघोली जिल्हा परिषद गटात कमी झाल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
याउलट शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांची या जिल्हापरिषद गटावर मजबूत पकड निर्माण झाली आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, माजी सरपंच शिवदास उबाळे यांच्या उपस्थितीमध्ये आज दाभाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून भाजप ला धक्का दिला आहे.