शिक्रापूर -येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा चार महिन्यांपूर्वी जयश्री भुजबळ यांनी राजीनामा दिला होता. नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयातून तो मंजूर झाल्याने सरपंच पदाची निवडणूक पार पडली. सरपंच पदाच्या निवडणुकीत हेमलता दत्तात्रय राऊत यांनी नऊ मते मिळवीत चुरशीच्या लढतीत बाजी मारली.
यावेळी सदस्य रामराव सासवडे, आबाराजे मांढरे, जयश्री भुजबळ, जयश्री दोरगे, नवनाथ सासवडे, गिता चव्हाण, संतोष भुजबळ, रोहिणी गिलबिले, गौरव करंजे, हेमलता राऊत, अनिता दिघे, भगवान वाबळे, मीना सोंडे, सुजाता खैरे, निलेश थोरात, अंजना भुजबळ, सागर सायकर हे उपस्थित होते. सरपंचपदासाठी हेमलता राऊत आणि सुजाता खैरे यांनी अर्ज दाखल केले.
यामध्ये हेमलता राऊत यांना नऊ तर सुजाता खैरे यांना आठ मते मिळाली. हेमलता राऊत यांची सरपंचपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र आळणे व बी. बी. गोरे, तलाठी अविनाश जाधव यांनी जाहीर केले. निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने माजी सभापती मंगलदास बांदल, जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, जिल्हा बॅंकेचे संचालक निवृत्ती गवारी यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच हेमलता राऊत यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गोरक्ष सासवडे, उपाध्यक्ष मल्हारी राऊत, माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले, दिलीप कोठावळे, दत्तात्रय भुजबळ, उत्तम गायकवाड, दत्तात्रय राऊत, विजय लोखंडे, रोहित खैरे, त्रिनयन कळमकर, किरण काळे, गजानन राऊत, बाबाजी राऊत यांसह आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
उपसरपंचांचा राजीनामा
सरपंच पदाची निवडणूक होताच उपसरपंच भगवान वाबळे यांनी राजीनामा दिला. नव्याने सरपंच झालेल्या हेमलता राऊत यांच्या सहीचे पत्र काही वेळातच सर्व ग्रामपंचायत सदस्यांना मिळाले असताना हा राजीनामा चर्चेचा विषय बनला आहे.