मंचर -निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे करोनाबाधित रुग्ण आढूळ आला असल्याने गाव केंद्रस्थानी धरून पाच किमीचे क्षेत्र बफरझोन जाहीर केले आहे. तरीही विनाकरण बाहेर फिरुन संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दोघांवर मंचर पोलिसांनी कारवाई केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.
संतोष बांबळे (वय 32), किरण महादेव ढोबळे (वय 34) यांच्यावर कारवाई केली आहे. पोलीस जवान सागर गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.