तालुक्यातील १३० संशयितांची स्वब तपासनी पूर्ण; १० रिपोर्ट प्रलंबित
बेल्हे (प्रतिनिधी) :- जुन्नर तालुक्यामध्ये सद्यस्थितीमध्ये एकूण करोना रुग्ण संख्या अकरा असून पैकी एक रुग्ण उपचारांनी बरा झाला असल्याची माहिती जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दिली. यामध्ये धोलवड – ३, सावरगाव-५, मांजरवाडी -१, खिलारवाडी १ याप्रमाणे करून पॉझिटिव्ह रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. डिंगोरे येथील एक रुग्ण बरा झाला आहे. करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे ट्रेसिंग करून हाय रिस्क कॉन्टॅक्ट व लो रिस्क कॉन्टॅक्ट याप्रमाणे वर्गीकरण केले जात आहे. हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील संशयित रुग्णांना लेण्याद्री येथील भक्त निवास भाग क्रमांक दोन येथील कोविड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी ऍडमिट केले आहे.सावरगाव येथील हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील आठ रुग्णांची चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
धोलवड येथील जांभूळपट, सावरगाव,मांजरवाडी व खिलारवाडी याठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेले आहेत.या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कलम १४४ नुसार लोकांची हालचाल पूर्णतः बंद केलेली आहे. सदर क्षेत्रांची नाकाबंदी केली असून एकूण ४४ पथकामार्फत दररोज सर्वेक्षण करण्यात येत आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील १५१ संशयित रुग्णांचे स्वब घेतलेले असून ११ पॉझिटिव्ह तर १३० अहवाल प्राप्त झालेले आहेत. १० जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
सर्व नागरिकांना तालुका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की सोशल डिस्टन्स ठेवावे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. सतत हात स्वच्छ धुवावेत.घरी विलीगिकरन केलेल्या नागरिकांनी विलीगीकरणाचे पूर्ण पालन करण्याचे आवाहन तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी केले आहे.