74 जण 31 मे रोजी होणार निवृत्त; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे – शहर पोलीस दलात 31 मे रोजी निवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.
करोनाच्या लढाईत चोवीस तास रस्त्यावर काम करत असताना अनेक पोलिसांना करोनाचा संसर्ग होत आहे. त्यातच आता अडीच हजारांपेक्षा जास्त पोलीस अधिकारी व कर्मचारी निवृत्त होत असल्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर ताण येण्याची शक्यता आहे. निवृत्त होणाऱ्यांमध्ये तीन सहाय्यक पोलीस आयुक्तांसह 14 अधिकारी असून, इतर कर्मचारी आहेत.
निवृत्त होणाऱ्या पोलिसांची संख्या पाहता किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून निवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षे मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यावर काय निर्णय होतो याकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे.