पुणे -आरोग्य खात्यातील रिक्त पदे भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असून यामध्ये वर्ग एक पासून परिचारिका आणि अन्य अशा 1105 पदांचा समावेश आहे. ही भरती केवळ 45 दिवसांसाठी करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये काही प्रमाणात सोयीसुविधा असल्या तरी, उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची आणि इतर मनुष्यबळांची कमतरता आहे. सद्यस्थितीत 1 हजार 877 पदे मंजूर आहेत. पैकी 1063 पदे कार्यरत असून, 815 पदे रिक्त आहेत. भरती प्रक्रियेत वर्ग एक मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची 200 पदे भरण्यात येणार आहेत.