मुंबई – आज राज्यातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने संभाव्य राजकीय पेचप्रसंग टळला असून यामुळं महाविकास आघाडीच्या गोटामध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेच्या आमदार पदी बिनविरोध निवड झाली असून यामुळं महाविकास आघाडीच्या सरकारवर असलेली टांगती तलवार अखेर दूर झाली.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध वर्णी लागल्याने त्यांचे पुत्र व शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे.
वडील उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेच्या आमदार पदी निवड झाल्याने आदित्य यांनी ट्विटरद्वारे आनंद व्यक्त करताना, “शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!” असं ट्विट केलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!@ShivSena @OfficeofUT
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 14, 2020