वाल्हे: आज (दि.१४) रोजी वाल्हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये ग्रामस्थ व व्यावसायिक यांच्या मध्ये संयुक्त बैठक झाली. यामध्ये ग्रामस्थांच्या सहमतीने शासकीय नियमांचे पालन करीत सलून व हॅटेल या व्यावसायिकांची दुकाने वगळता बाकी सर्व दुकाने, सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये गर्दी रोखण्यासाठी ठिक- ठिकाणी रस्ते बंद केले होते, ते बंद केलेले सर्वच रस्ते खुले करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी झालेल्या बैठकीमध्ये प्रा. डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी सर्व व्यावसायिकांना सोशल डिस्टनसचे पालन करित, मास्क तसेच सॅनिटायझरचा वापर आवश्य करण्याचे आव्हान प्रा. दुर्गाडे यांनी यावेळी केले. तसेच आलेल्या प्रत्येक ग्राहकांचे नावं तसेच मोबाईल नंबर, व पत्ता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या बैठकीला पुणे जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ दिगंबर दुर्गाडे, सरपंच अमोल खवले, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, गिरीश पवार, तंटामुक्ति अध्यक्ष समदास भुजबळ, माजी तंटामुक्ति अध्यक्ष सत्यंवान सुर्यवंशी, वाल्हे पोलिस चौकीतील पोलिस कर्मचारी बी.व्ही.जगदाळे, ग्रामविकास अधिकारी बबन चखाले,सागर भुजबळ, पतंग शहा, अमोल भुजबळ, हनुमंत पवार, डॉ. रोहिदास पवार तानाजी भुजबळ, जयवंत भुजबळ, दादा म्हेञे यांनसह व्यावसायिक उपस्थिती होते.