पुणे – शहरातील सील केलेल्या परिसरात जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद यांनी पाहणी करून बाहेर उभे, फिरणाऱ्या व्यक्तींना घरात थांबण्याचे आवाहन केले. तसेच, यापुढील तीन दिवसांत या सील केलेल्या भागांतील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आजारी व्यक्तींना तत्काळ रुग्णालयात पाठवून त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, व्यक्तींची पाहणी आणि तपासणीसाठी दोनशेहून अधिक पथके तयार केली आहे. त्याला जिल्हा परिषदेकडून रुग्णवाहिका दिली आहे.
पूर्व पुणे भागात राहणाऱ्या आडते, कामगार, कर्मचारी आणि वाहन चालकांनी मार्केट यार्डातील बाजार आवारात प्रवेश करू नका. या आदेशाचा भंग करणाऱ्यास साथ नियंत्रण कायद्यातील तुरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
– बी. जे. देशमुख, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती