मुंबई : दाट लोकवस्ती असणाऱ्या धारावीतील एका 14 मजली इमारतीत 300 रहिवाशांचे विलगीकरण केले असतानाच धारावीत तीसरा कोरोना बाधीत सापडल्याने राज्याच्या आणि पालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
हा बाधीत 35 वर्षीय डॉक्टर असून त्याच्या निकटच्या संपर्कात 25 जण होते. या डॉक्टरची टेस्ट काल पॉझिटिव्ह आली. या इमातीतील अन्य व्यक्तींना त्यांचे चाचणीचे निकाल येईपर्यंत विलगीकरणात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या इमारतीतील तीन दवाखाने आणि 48 सदनिका निर्जंतुकीकरणासाठी सील केल्या आहेत.
महापालिकेचा एक 52 वर्षीय सफाई कर्मचारी आणि एका दुकानदार कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तीनही रुग्णांचा धारावीशी आलेला संबंध तपासून पाहिला जात आहे. या डॉक्टरने एका खासगी लॅबशी चाचणी घेण्यासाठी संपर्क साधला होता, अशी माहिती हाती येत आहे.