पिरंगुट- बावधन (ता. मुळशी) येथे मजुरांना पंधरा दिवस पुरेल एवढा किराणा वाटप करण्यात आले. आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध उद्योजक शांतीलाल मुथ्था, बावधनचे माजी आदर्श सरपंच नीलेश दगडे आणि मुळशी तालुका युवक कॉंग्रेसच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या एक हजार किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी मावळ – मुळशीचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के, तहसलीदार अभय चव्हाण, गटविकास अधिकारी संदीप जठार, पौडचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, हिंजवडी पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, मुळशी तालुका भाजपचे कार्याध्यक्ष उद्योजक राजेंद्र बांदल, वातुंडेचे सरपंच अमोल शिंदे, बावधन उपसरपंच बापु दगडे उपस्थित होते.