सिडनी – चीनसह जगभरात पसरलेल्या करोना विषाणूंचा प्रवेश जागतिक क्रिकेटमध्येही झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज केन रिचर्डसन करोनाने बाधीत झाल्याचे गुरुवारी सांगण्यात आले होते. मात्र, त्याच्या चाचणीचा अहवाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून तो चाचणीत निगेटिव्ह ठरला आहे.
करोनासदृश लक्षणे आढळल्याने केनची चाचणी करण्यात आली. करोनाच्या भीतीने त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते. केन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सहभागी झाला होता, त्यानंतर संघ मायदेशी परतल्याने केन आजारी पडला होता. त्याचसाठी ही चाचणी करण्यात आली.
दरम्यान, चीनसह जगभरात पसरत असलेल्या करोना विषाणूंच्या धोक्यामुळे ऑस्ट्रेलिया विरूध्द न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील उर्वरीत दोन सामने रद्द करण्यात आले आहेत. तसेच या मालिकेनंतर होणारा ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंड दौराही पुढे ढकलण्यात आला आहे.