पिंपरी : महिलांवर वाढलेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या (पिंपरी-चिंचवड) वतीने मंगळवारी (दि. 25) काळ्या फिती लावून महाआघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. आकुर्डी येथील हवेली अतिरिक्त तहसील कार्यालयात अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. या प्रसंगी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनाला महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश सचिव उमा खापरे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, एकनाथ पवार, अमित गोरखे, अमोल थोरात, ऍड. मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे, राजेश पिल्ले, महेश कुलकर्णी, बाबू नायर, माऊली थोरात, अनुप मोरे, नगरसेविका झामाबाई बारणे, सीमा सावळे, आशा शेंडगे, सोनाली गव्हाणे, शारदा सोनावणे, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, नगरसेवक शितल शिंदे, शत्रुघ्न काटे, रवी लांडगे, तुषार कामठे, केशव घोळवे आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारच्या कल्याणाबाबत बेफिकीर आहे. या बेफिकिरीमुळे महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजप तीव्र निषेध करीत असल्याची भूमिका या प्रसंगी विविध वक्त्यांनी मांडली.