दूध दरवाढीची मागणी; सरकारच्या विरोधात घोषणा
वाठार स्टेशन (प्रतिनिधी) – दूधदरवाढी साठी वाठार स्टेशन येथील भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संकलन केंद्रासमोर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सरकार विधोत घोषणा दिल्या.
दुधाची दरवाढ करावी, दूध पावडरसाठी 50 रुपये भाव द्यावा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दहा रुपये प्रमाणे दुधाचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावे, अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांमध्ये भाजपचे जिल्हा चिटणीस मनोज कलापट, भाजप तालुका उपाध्यक्ष राजेश काळोखे, शालेय समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे, किसान मोर्चाचे सचिन जाधव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष धर्मेंद्र निंबाळकर, उद्योजक यशवंत पवार, संजय गायकवाड, नवल जाधव, हणमंत मांडवे तसेच शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.