खा.डॉ.अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन : आंबेगाव महोत्सव2020 चे उद्घाटन
आंबेगाव बुद्रुक – छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मनामनात जागविला जाणार असेल तर तिथीनूसार काय आणि तारखेनूसार काय 365 दिवस प्रत्येकाच्या मनात शिवजयंती साजरी व्हावी असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आंबेगाव महोत्सव 2020 मध्ये केले.
गेली 14 वर्ष सलग जनहित विकास मंच पुणे यांचे तर्फे आंबेगाव महोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. या निमित्त आयोजित कार्यक्रमात स्थायी समिती सदस्या नगरसेविका स्मिता कोंढरे यांचे तीन वर्षाचा विकास कामांचा कार्य अहवाल प्रकाशन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे शुभ हस्ते करण्यात आले तसेच नुकत्याच पार पडलेल्या समूह नृत्य स्पर्धेमधील विजेत्यांना पारितोषिके ही देण्यात आली.
यावेळी नितीन मोरे प्रस्तुत महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. त्याला परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक युवराज बेलदरे, नगरसेविका नंदाताई लोणकर, पुणे शहर महिला आघाडीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्षा स्वाती पोकळे, नगरसेवक प्रकाश कदम, अनिल कोंढरे, विकास दांगट पाटील, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 14 व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत ते स्वराज्यासाठी झिजले. त्यांच्या कार्याची ओळख नवीन पिढीला व्हावी म्हणून आपण हा सोहळा साजरा करतो.
– स्मिता कोंढरे, नगरेसविका