हडपसर – शिरुरचा खासदार कार्यसम्राट हवा, नटसम्राट नको, ज्या अमोल कोल्हेंनी खासदार झाल्यावर काही वर्षांतच मला भेटून दादा मला सिरियलचं शुटींग असतं, नाटकांची कामं असतात, मी कलावंत आहे. मला वेळ मिळत नाही, माझं नुकसान होतंय मला राजीनामा द्यायचा आहे, अशी प्रकारची व्यथा मांडली.
खासदारकीचा राजीनामा द्यायला निघाला आणि आता पुन्हा निवडणुकीला उभारलाय, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी डॉ. अमोल कोल्हेंवर निशाणा साधला. तर मोदींना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीने आढळरावांना पुन्हा खासदार करा, त्यासाठी जीवाचं रान करून प्रचार करा असे आवाहनही त्यांनी केले.
हडपसर विधानसभा मतदार संघ महायुती -राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी महायुतीचे शिरुर विधानसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळऱाव पाटील, आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, सुरेश घुले,
प्रदीप गारटकर, उल्हास तुपे, माजी सरपंच शिवराज घुले, माजी नगरसेवक आनंद अलकुंटे, सुनिल बनकर, प्रकाश कदम, सुनिल कदम, रंजना टिळेकर, नंदा लोणकर, डॉ. शंतनू जगदाळे, अजित घुले, जीवन जाधव, नितीन होले, अभिजित बोराटे, खन्नासिंग कल्याणी, विकी माने, महादेव दंदी, तसेच मोठ्या संख्येने महिला, युवकवर्ग आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आढळराव यांच्या हडपसरमधील जनसंपर्क कार्यालयाचे देखील अजित पवार यांच्या हस्ते उद् घाटन झाले. शेकडो तरुणांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
राज्यातील प्रकल्पांच्या उभारणीसाठी आणि राज्याच्या प्रगतीसाठी नरेंद्र मोदींच्या बळकटीचा निर्धार आपण केला आहे. त्यासाठी मी शिरुरमधून निवडणुकीला उभा आहे. महायुतीला बळकट करण्याचे शिवधनुष्य हाती घेऊन, कार्यकर्त्यांनी विकासकामे करणधार्यांना साथ द्यावी. -शिवाजीराव आढळराव पाटील, महायुतीचे उमेदवार