पारगाव शिंगवे -पारगाव (ता. आंबेगाव) येथील श्री संगमेश्वर माध्यमिक आणि कै. बाबुराव गेणूजी उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी बोर्डाच्या इंग्रजी विषयाच्या लेखी परीक्षेला 495 विद्यार्थी बसले होते.
पारगाव येथील श्री संगमेश्वर विद्यालयातील केंद्रावर इंग्रजी विषयाची लेखी परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थांचे स्वागत विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव ढोबळे यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक शांताराम ढोबळे (गुरुजी), पर्यवेक्षक कैलास येलभर, मराठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब ढोबळे, उपसरपंच सुनंदा ढोबळे, विजया लोंढे, बाळासाहेब पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या परीक्षा केंद्राचे संचालक म्हणून प्राचार्य प्रकाश सुतार काम पहात आहेत, तर उपसंचालक म्हणून राजेंद्र गवारी काम पाहत आहेत. परीक्षा केंद्रावर मोबाइलवर बंदी घालण्यात आली आहे, तसेच परीक्षेत गैरप्रकार होऊ नये यासाठी सर्व वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुलांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.