बीजिंग : कोरोना विषाणूने चीनमध्ये हाहाकार पसरविला आहे. या विषाणूमुळे एकाच दिवसात ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील वुहान प्रातांत सर्वाधिक म्हणजे ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. 97
आतापर्यंत चीनमध्ये ४० हजारहून अधिक जणांना करोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याचे उघड झाले आहे. तर, विषाणूमुळे आतापर्यंत ९०८ जणांचा मृत्यू झाला आहे. करोना व्हायरसच्या आजारातून धोका टळल्यामुळे ३२८१ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
दरम्यान भारतात केरळमधील तिघांना करोना व्हायरसची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. करोना व्हायरसच्या संसर्गामुळे भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष काळजी घेण्यात येत आहे. विमानतळावर प्रवाशांच्या तपासणी करण्यात येत आहे. रविवारपर्यंत एक लाख सत्यांनो हजार १९२ प्रवाशांची तपासणी करण्यात आलीआल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.