बीजिंगः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना पत्र लिहून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाविरुद्ध लढा देण्यासाठी भारत सोबत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, चीनकडून या पत्राचे उत्तर आले. चीनने पंतप्रधान मोदींच्या मदतीच्या पात्राची प्रशंसा केली आणि ते “बीजिंगशी भारताची मैत्री पूर्णपणे दर्शवते” असे म्हटले आहे.
शी जिनपिंग यांना लिहिलेल्या पत्रात मोदींनी व्हायरसच्या प्रादुर्भावाबद्दल चीनच्या लोकांशी एकता दर्शविली. या संसर्गामुळे शेजारच्या देशात 900 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले, “कोरोना विषाणूविरूद्ध चीनच्या लढाईत भारताच्या पाठिंब्याबद्दल आम्ही आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो.”