मुंबई – मुंबईमध्ये नाइट लाइफ सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. २७ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरू करण्यासंदर्भातील माहिती पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले कि, मॉल्स तसेच मोठी करमणूक केंद्रातील उपहारगृह 24 तास सुरु राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मात्र,रात्री दिड वाजल्यानंतर मद्यपानाला परवानगी नसणार आहे.तसेच यामुळे पोलिसांवरही ताण येणार नसल्याची माहिती दिली आहे. रोजगार निर्मिती आणि महसूल वाढवण्याबरोबर लोकांना २४ तास सेवा मिळावी या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील नरिमन पॉईट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
Maharashtra Minister Aaditya Thackeray: Proposal of Mumbai 24×7 has been approved by Cabinet today. From 27th January malls, multiplexes,shops&eateries in non-residential areas like Bandra Kurla Complex&Nariman Point will remain open 24×7. However, we won’t impose this on anyone. pic.twitter.com/Hw6QRJbzWb
— ANI (@ANI) January 22, 2020
24 तास आणि 7 ही दिवस सुरू रहाणार असलेली नाईट लाईफ रहिवासी भागातच प्रायोगिक तत्वावर सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना कोणताच त्रास होणार नसल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. तर पोलिसांनाही गस्तीच काम असतं. पण, नाईट लाईफमुळे पोलिसांवर कोणताही ताण येणार नाही. कारण दुकान मालकांना स्वतःची सुरक्षा घेण्याची नियम करण्यात आला. त्यात मोबदला देऊन पोलिसांची सुरक्षा घेऊ शकतात. यामुळे पोलीस विभागाच्या उत्पन्नात भर पडेल, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.