तेहरान : तेहरान येथील मुख्य विमान तळावरून उड्डाण केल्यानंतर युक्रेनचे विमान कोसळल्याने किमान १७६ जण मरण पावले. या अपघातानंतर युक्रेनच्या विमानाचा अपघात झाला होता की ते पाडण्यात आलं होतं अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
Iran state TV, citing military, says country ‘unintentionally’ shot down Ukrainian jetliner because of human error: The Associated Press pic.twitter.com/HhPUZemVgD
— ANI (@ANI) January 11, 2020
दरम्यान, या अपघाताबाबत इराणच्या लष्करानी स्थानिक वृत्त माध्यमांना धक्कादायक माहिती सांगितली आहे. इराणच्या लष्करानी वृत्त माध्यमांना कबुली दिली की,’हे विमान चुकून पाडलं असल्याची कबुली इराणच्या लष्करानं दिली आहे. यामध्ये १७६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.’
तत्पूर्वी, युक्रेनचे जे विमान बुधवारी अपघातग्रस्त झाले ते प्रत्यक्षात इराणने पाडल्याची गुप्तचर माहिती हाती आली असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन थ्रुडू यांनी सांगितलं होतं.