पॅरिस -फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिने मार्टिना ट्रेवीसानचा पराभव केला. आई बनल्यावर तब्बल 16 महिन्यांनंतर स्वितोलिना टेनिस कोर्टवर उतरली होती. यंदाच्या मोसमातील ही तीची पहिलीच ग्रॅंडस्लॅम स्पर्धा आहे. तीने ट्रेविसानचा 6-2, 6-2 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.
इतक्या महिन्यांच्या खंडानंतरही ती तंदुरुस्ती टीकवून असल्याचेच तीने सिद्ध केले. 2017 साली ती टेनिस क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर होती. मात्र, आता खंड पडल्यामुळे ती 192 व्या स्थानावर आहे.
अन्य लढतीत ट्युनिशियाच्या ओन्स जेबुरने ल्युसिया ब्रोन्झेटीवर 6-4, 6-1 अशी मात केली. यजमान फ्रान्सच्या डेनी पेरीने युक्रेनच्या अनेलीना कलीनीनाचा 6-2, 6-3 असा पराभव केला. एलिसन रिस्क अमृतराजने रशियाच्या मिरा आंद्रीव्हावर 6-2, 6-1 अशी मात केली. पुरुष एकेरीत नॉर्वेच्या स्विडनच्या एलिस मेरचा 6-4, 6-3, 6-2 असा पराभव केला.