किव्ह : युक्रेनवर आपले हल्ले रीशयाने सुरूच ठेवले आहेत. काळ्या समुद्रातील एका बेटावर रशीयन युध्दनौकांनी बॉम्बिंग करण्याची धमकी दिल्यानंतरही युक्रेनच्या वीर जवनांनी त्याला भीक घातली नसल्याचे समोर येत आहे. मात्र कमकुवत समजल्या जाणाऱ्या युक्रेनने रशियाचे एक हजार सैनिक ठार केल्याचं समोर आलं आहे.
युक्रेनच्या प्रतिहल्ल्यात रशियाचे एक हजारपेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याचा, दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. या हल्लायमुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमीर पुतीन हादरल्याचं सांगण्यात येत आहे.
बलाढ्य रशियाने आतापर्यंत युक्रेनचे १८ टँक, ७ रॉकेट सिस्टम आणि ४१ मोटार वाहन उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. तसेच अनेक युक्रेन सैनिकांनी रशियन सैन्यासमोर शरणागती पत्करल्याचंही रशियानं म्हटलंय. मात्र युक्रेनकडून वेगळीच माहिती देण्यात आली आहे.
युक्रेनमध्ये १३७ जणांचा मृत्यू तर ३०० हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्याचवेळी प्रत्युत्तरात युक्रेननं केरशियाचे ८०० सैनिक मारल्याचं म्हटलं आहे. तसंच रशियाचे ३० टँक आणि १३ विमान – हेलिकॉप्टर उद्ध्वस्त केल्याचंही युक्रेननं म्हटलंय.