नवी दिल्ली : नव्या दशकासाठी जनगणनेच्या कामाला 1 मे 2020 पासून सुरुवात होणार आहे. यासाठी पूर्वतयारीही सुरु झाली आहे. यासाठी सरकारकडून अनेक बैठकाही घेतल्या जात आहेत. सरकारने जनगणनेदरम्यान विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांची अधिसुचनाही प्रसिद्ध केली आहे.
Registrar General and Census Commissioner of India Vivek Joshi issues notification on information to be sought by Census officers during census 2021. pic.twitter.com/A2eybMitWy
— ANI (@ANI) January 9, 2020
जनगणना कायदा कलम 8 च्या उपकलम 1 नुसार होणार होत असलेल्या जनगणनेसाठी सरकारने सर्व जनगणना कार्यालयांना प्रश्नावली पाठवली आहे. या प्रश्नांमध्ये घराच्या मालकाचे नाव, घर क्रमांक आणि घराच्या स्थितीसह अनेक प्रश्नांचा समावेश आहे.