केपटाऊन : इंग्लंड-द.आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेतील दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यात अष्टपैलू बेन स्टोक्सने मोक्याच्या क्षणी घेतलेल्या ३ विकेटमुळे इंग्लंडने द.आफ्रिकेवर १८९ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-१ अशी बरोबरी साधली आहे.
RESULT| ENGLAND BEAT SOUTH AFRICA BY 189 RUNS
Philander hangs the bat out to Stokes, the ball loops up to gully and Bess takes it to complete England's victory.
Incredible discipline by the #ProteaFire 👏
They fought hard but it wasn’t enough.#SAvENG pic.twitter.com/INues4jpXX— Proteas Men (@ProteasMenCSA) January 7, 2020
विजयसाठी ४३८ धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर आफ्रिकेने २ बाद १२६ अशी मजली मारली होती. अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात केशव महाराज (२), फाफ डु प्लेसी (१९), ज्यु. पीटर मालन (८४) हे झटपट बाद झाल्याने आफ्रिकेची ८६.५ षटकांत ५ बाद १७१ अशी स्थिती झाली होती. पण त्यानंतर क्विंटन डीकाॅक आणि रासी व्हॅन डर दुसान यांनी सहाव्या विकेटसाठी ४४ षटके किल्ला लढवून इंग्लंडचा विजय लांबणीवर नेला.पण डी काॅकला जो डेनलीने आणि रासी व्हॅन दुसानला स्टुअर्ट ब्राॅडने बाद करत विजयातील अडथळा दूर केला. डी काॅकने १०७ चेंडूत ५० तर दुसानने १४० चेंडूत १७ धावा केल्या. त्यानंतर दिवसाचा खेळ आटोपण्यास ८.२ षटके शिल्लक असताना बेन स्टोक्सने शेवटचे ३ गडी बाद करत इंग्लंडला विजय मिळवून दिला.
⭐ 119 runs, including a quick-fire 72
⭐ 6 catches
⭐ 3 wicketsWhat a match Ben Stokes has had 🔥 #SAvENG pic.twitter.com/5POXFXvHbs
— ICC (@ICC) January 7, 2020
तत्पूर्वी, इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद २६९ धावा केल्या होत्या, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला २२३ धावांत गुंडाळत इंग्लंडने ४६ धावांची आघाडी घेतली होती. दुस-या डावात इंग्लंडने डोमिनिक सिबलीच्या नाबाद १३३ आणि बेन स्टोक्सच्या ७२ धावांच्या खेळीच्या जोरावर चौथ्या दिवशी दुसरा डाव ८ बाद ३९१ वर घोषित केला. पहिल्या डावातील ४६ धावांच्या आघाडीसह इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेसमोर ४३८ धावांचे आव्हान ठेवले होते.