नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आपली कारवाई सुरु केली आहे. इथल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या बुरखाधारी लोकांना शोधण्याचे काम सुरु आहे.
यातच, बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री यांनी सोशल मीडिया वर संताप व्यक्त करत निषेध केले आहे. तर दिग्दर्शक विशाल भारद्वाज, अनुराग कश्यम, अनुभव सिन्हा, जोया अख्तर, रीमा कागतीशिवाय अभिनेत्री तापसी पन्नू, दिया मिर्झा, गौहर खान, श्वेता त्रिपाठी यांनसारख्या अनेक कलाकारांनी या हल्ल्याच्या निषेध नोंदवत, आंदोलनात सहभाग नोंदवला. यातच आता अभिनेते सुनील शेट्टी यांनी ट्विट द्वारे प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेते सुनील शेट्टी यांनी ट्विटद्वारे म्हणाले,’हे सर्व फार भयंकर आहे, मी हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई होऊ शकतो , तसेच मी बीजेपी, कांग्रेस, शिवसेना, एनसीपी किंवा इतर राजनैतिक दलातील असू शकतो, मात्र मला काही अधिकार नाही की मी शिक्षेच्या मंदिरात जाऊन आणि तेथील विद्यार्थाना मारहाण करू, बुरखाधारण करता आणि आपल्या स्वःताला पुरुष म्हणतात ? जर तुम्ही पुरुष असाल तर बिंदास फिरा ना ? ज्या कुठल्या लोकांनी हे केले आहे ते ठीक नाही.’ असं म्हणत संताप व्यक्त केला.