मुंबई – वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांची पुन्हा एकदा नेटिझन्सनी शाळा घेतली आहे. यापूर्वी आरेतील वृक्षतोडीच्या प्रकरणावरून प्रवीण तरडेंवर निशाणा साधला होता.
दरम्यान, जेएनयुत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे देशपातळीवर संतापाच वातावरण असताना, प्रवीण तरडे यांनी एका फेसबुक पोस्टवर कमेंट करताना, “संपूर्ण देश भाजपासोबत आहे” असं म्हंटल आहे. त्यामुळे नेटिझन्सनी तरडेंना चांगलंच ट्रोल केला आहे.
पत्रकार राजू परुळेकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये, ”एकतर तुम्ही देशासोबत आहात किंवा तुम्ही भाजपासोबत आहात. ठरवा.” असं परुळेकर यांनी लिहलं होत.
मात्र त्यांच्या या पोस्टवर प्रविण तरडेंनी कमेंट करताना, ‘संपूर्ण देश भाजपा सोबत आहे…’ असं म्हंटलं. तरडेंच्या कमेंटवरुन नेटीझन्सने त्यांना चांगलच ट्रोल केलंय. विशेष म्हणजे जवळपास 2 हजार जणांनी तरडेंना कमेंटमधून उत्तर दिलंय. त्यामध्ये तरडेंच्या कमेंटचा समाचार घेतलेल्याच कमेंट सर्वाधिक दिसून येत आहेत.