बॉलीवूड ऍक्टर, सिंगर आणि म्युझिक डायरेक्टर हिमेश रेशमिया पुन्हा एकदा फॉर्मात आला आहे. हिमेश आणि ऍक्ट्रेस सोनिया मानच्या आगामी “हॅपी, हार्डी ऍन्ड हीर’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. त्यामध्ये हिमेश एका सरदारजीच्या वेशभुषेमध्ये दिसतो आहे. मुख्य म्हणजे यामध्ये हिमेशचा डबल रोल असणार आहे. अर्थात प्रेमाचा त्रिकोण ही पारंपारिक थीम घेऊनच हा सिनेमा पडद्यावर येतो आहे.
त्यात कॉमेडीचा तडकाही असणार आहे आणि म्युझिक मस्तीही असणार आहे. या सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे या ट्रेलरमध्येच रानू मोंडलने म्हटलेले पहिले गाणे ऐकायला मिळते. या सिनेमातून हिमेशने रानू मोंडलला पहिल्यांदा पार्श्वगायिका बनवले आहे. त्यामुळे करिअरमधील तिचा हा पहिलाच सिनेमा असेल.
रानू मोंडलने म्हटलेले “तेरी मेरी कहानी…’ हे गाणे खूप व्हायरल होते आहे. या ट्रेलरमुळे हिमेशचा हटके लुक, डबल रोल, अनुनासिक आवाज, रानू मोंडलने गायलेले पहिले गाणे अशा वेगवेगळ्या गोष्टी प्रेक्षकांपुढे एकदम आल्या. या ट्रेलरला 2 तासांत 31 हजार हिट्स मिळाल्या होत्या. सिनेमा 31 जानेवारीला रिलीज होतो आहे.