विधु विनोद चोप्राच्या बहुप्रतिक्षित “शिकारा’चा ट्रेलर प्रसिद्ध झाला. काश्मिरी पंडितांच्या व्यथांचे चित्रण यामध्ये असणार आहे. काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून हुसकावून लावण्यात आले त्या अनुभवांना पडद्यावर मांडण्याचा हा पहिलाच प्रयत्न असणार आहे.
सिनेमाच्या लीड रोलमध्ये सादिया आणि आदिल खान ही एकदम नवीन फ्रेश जोडी पडद्यावर पदार्पण करणार आहे. काश्मीरमधून जवळपास 4 लाख काश्मिरी पंडीतांना आपल्याच देशात निर्वासित व्ह्यायला लागले होते. तीन दशकांनंतर ही व्यथा सिनेमाच्य स्वरुपात लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. काश्मिरी पंडीत असलेले एक जोडपे आपल्या घराच्या खिडकीतून बाहेर बघते आहे.
बाहेर अन्य काश्मिरी पंडीतांची जळणारी घरे दिसत आहेत, असे या ट्रेलरमध्ये दिसते आहे. अंगावर शहारे आणणारे हे दृश्य असेल. सिनेमाचे बहुतेक चित्रीकरण जम्मू काश्मीरमध्ये आणि प्रामुख्याने काश्मीर खोऱ्यामध्येच झाले आहे. त्याला अलीकडच्या काळातील 370 कलम रद्द होण्याच्या वर्तमान स्थितीचाही ओझरता स्पर्श असण्याची शक्यता आहे. विधु विनोद चोप्राचीच निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला “शिकारा’ हा सिनेमा 7 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.