नवी दिल्ली : केरळची राजधानी तिरुवनंतपूरम येथील स्थानिक न्यायालयाने कॉंग्रेस नेते, खासदार शशी थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. शशी थरूर यांनी त्यांच्या एका पुस्तकातून हिंदू महिलांचा अवमान केल्याचा आरोप आहे. परिणामी थरूर पुन्हा अडचणीत सापडले आहेत.
शशी थरूर यांनी त्यांच्या एका पुस्तकातून हिंदू महिलांचा अवमान केल्याचा आरोप असून याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने थरुर यांच्याविरोधात नोटीस जारी केली होती. पण ते स्वतः न्यायालयाने हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्याची माहिती आहे. तर, न्यायालयाकडून आलेल्या समन्समध्ये कधी उपस्थित राहावे याचा नेमका उल्लेख नव्हता अशी माहिती थरुर यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
दुसरीकडे, अलीकडेच साहित्य अकादमीने इंग्रजीसाठी डॉ. शशी थरूर यांना एन एरा ऑफ डार्कंनेससाठी पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून पुस्तक लिहिण्यास सुरूवात करणाऱ्या थरूर यांनी आतापर्यंत दोन डझनहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.