डान्स मास्टर प्रभुदेवाबरोबर “मुकाबला’मध्ये श्रद्धा कपूरनेही स्क्रीन शेअर केले आहे. पण त्याच्याबरोबर डान्स करताना ती अगदीच नर्व्हस झाली होती. तिने ट्वीटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “प्रभुदेवाबरोबर डान्स करणे हा माझा बहुमान होता. मी खूप नर्व्हस झाले होते. पण त्यानेच मला प्रोत्साहन दिले आणि शुटिंगसाठी कम्फर्टेबल केले.
त्याला डान्स करताना लाईव्ह बघणे आणि त्याच्याबरोबर डान्सची संधी मिळणे, ही एक लाईफटाईम अचिव्हमेंट आहे.’ असे ती म्हणाली. आपल्याला ही संधी दिल्याबद्दल तिने रेमो डिसोझाचे आभार मानले आहेत. “स्त्री’, “साहो’ आणि “छिछोरे’ला लागोपाठ मिळालेल्या यशामुळे श्रद्धाच्या यशाचा ग्राफ अगदी उंचावला आहे. पुढच्या वर्षी पहिल्या सहा महिन्यातच तिचे दोन आणखी सिनेमे रिलीज होणार आहेत.
कोरिओग्राफर रेमो डिसोझानेच डायरेक्ट केलेल्या “स्ट्रीट डान्सर 3’ने आतापासून हवा करायला सुरुवात केली आहे. “स्ट्रीट डान्सर 3′ पुढच्या वर्षी 24 जानेवारीला रिलीज होणार आहे. त्यामध्ये प्रभुदेवा आणि नोरा फतेही लीड रोलमध्ये असणार आहेत.