“गली बॉय’ची ट्‌वीटरवर चलती

बॉलिवुडमध्ये यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेला “गली बॉय’ हा चित्रपट खूपच चर्चेत राहिला आहे. या चित्रपटाने अनेक पुरस्कारही पटकाविले आणि भारताकडून ऑस्करसाठीही या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. रणवीर सिंह आणि आलिया भट्‌ट स्टारर चित्रपट भलेही ऑस्कर पुरस्कारच्या शर्यतीतून बाहेर पडला असेल, परंतु त्याला अनेकांनी पसंती दर्शविली आणि त्यावर चर्चाही केली.


तसेच या “गली बॉय’ने यंदाच्या वर्षी ट्‌वीटरवरही राज केले. ञ्चढहळीकरशिपशव 2019च्या अहवालानुसार, हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वाधिक ट्‌वीट झालेला चित्रपट ठरला आहे. म्हणजे यंदाच्या वर्षी हिंदी चित्रपटांमध्ये “गली बॉय’बाबत सर्वाधिक ट्‌वीट करण्यात आले. जोया अख्तर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट रॅपर नावेद शेख यांच्यावर आधारित आहे.

या यादित म्युझिकल रोमांटीक ड्रामा असलेला “कबीर सिंह’ आणि अक्षय कुमार स्टारर “मिशन मंगल’ हे चित्रपट अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर “केसरी’, “हाउसफुल-4′, “उरी ः द सर्जिकल स्ट्राइक’, “कलंक’, “सुपर-30′ आणि “आर्टिकल 15′ आदी चित्रपटांचा समावेश आहे. या यादीवर एक नजर टाकल्यास यात अक्षय कुमारच्या चित्रपटांनी सर्वाधिक स्थान मिळविले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.