हडपसर – सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता मुस्लीम समाजबांधवांनी जातीयवादी शक्तीविरुद्ध लढा देण्याचे ठरवले असून समाजाची मते न विभागता ती एकत्रितपणे राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांना देऊन त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार मुस्लीम बांधवांनी केल्याचे माजी नगरसेवक फारूक इनामदार यांनी सांगितले.
सय्यदनगर येथे मुस्लीम विचार मंचचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी इनामदार बोलत होते.
यावेळी प्रा. नाझरुद्दीन, कबीर शेख, सुलतान खान, मौलाना हाफिज, जफर भाई, सलीम भाई, बबलू पटेल, इम्रान इनामदार, मुन्ना जहागीरदार, जब्बार पठाण, फाफिज अब्दुल हमीद, गफूर पठाण, नदीम मुजावर, रईस सुंडके, अनिस सुंडके, हाजी फिरोजभाई, फेमिना सय्यद,मोहमद्दीन खान, बापू मुलाणी, फिरोज भाई नालबंद, फैय्याज शेख, नयीम शेख आदी उपस्थित होते.
एमआयएमला मत म्हणजे भाजपला मत असून असे होऊ देऊ नका. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा अल्पसंख्याकांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याने महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांना मताधिक्य देण्याचा निर्धार या मेळाव्यात केल्याचे इनामदार म्हणाले.