चेतन तुपे यांच्याकडून वडिलांच्या राजकीय, सामाजिक आठवणींना उजाळा
हडपसर – या भागाने स्वर्गीय विठ्ठल तुपे यांना खासदार, आमदार बनविले, आता त्यांच्या मुलाला आशीर्वाद देऊन त्यांना तुमची सेवा करण्याची संधी द्या, अशी भावनिक साद राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी हडपसर येथे मतदारांना घातली, तर राजकारण करताना ते विकासाचे राजकारण असावे, असे विचार पेरणारे स्वर्गीय विठ्ठल तुपे यांचेच बाळकडू आपल्यामध्ये असून त्याच संस्कारातून या मतदारसंघातील विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी प्रचारफेरीद्वारे मगरपट्टा, लोहियानगर, माळवाडी, डीपी रोड, अमर कॉटेज, भोसले गार्डन या भागात नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी नगरसेवक बंडू तात्या गायकवाड, नगरसेविका हेमलता निलेश मगर, नगरसेविका पूजा कोद्रे, वासंती काकडे, मंगेश तुपे पाटील, नगरसेवक अशोक कांबळे, प्रवीण तुपे, निलेश मगर, संदीप नाना तुपे, प्रशांत मामा तुपे, चंद्रकांत कवडे, बंडू तुपे, संजय शिंदे, बाळासाहेब तुपे, समीर कोद्रे, हनूमंत तुपे, प्रदीप मगर, दत्तात्रय तुपे, बाळासाहेब जाधव, विजय तुपे, अविनाश काळे, भाऊ तुपे, प्रशांत पवार, रुपेश तुपे, कुमार तुपे आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, रिपाइं जोगेंद्र कवाडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाल्याचेही तुपे यांनी सांगितले तर, राज्यातल्या भाजप सरकारविरोधातला रोष जनतेच्या मनात आहे, यांनी फक्त खोट्या भूलथापा, आमिषे दाखवली, जनता यांच्या राजकारणाला एकदा फसली परंतु यांच्या पापाचा घडा आता भरला आहे. जनताच या निवडणुकीत त्यांना घरचा रस्ता दाखवेल, अशी खरमरीत टीका हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी केली.