जेव्हा ‘सिंघम’ला भेटतो ‘सिम्बा’ आणि दोघांनाही मिळतो ‘सुर्यवंशी’…

मुंबई – बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या त्याच्या आगामी सूर्यवंशी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार प्रमुख भूमिका साकारणा आहे. सध्या या चित्रपटातील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे चित्रपटात अक्षयसोबतच रणवीर आणि अजय देवगण हे दोघेही झळकणार असल्याची चर्चा आहे. हे तिघेही पोलिसांच्या भूमिकेतील कलाकार बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा विक्रम रचण्यासाठी सज्ज झाले आहेत.

दरम्यान, अक्षयने शेअर केलेल्या फोटोत तीन सुपरस्टार एकत्र दिसत आहेत. रणवीर सिंग आणि अजय देवगण पोलिसांच्या कपड्यात दिसत असून अक्षय त्यांच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसत आहे आणि तिघांनीही खाकी वर्दी घातली आहे. अक्षयच्या मागे पोलिसांची फौज मोहिमेसाठी रवाना होत असल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या वर्दीतील देसी अॅवेंजर्स, जेव्हा ‘सिंघम’ला भेटतो ‘सिम्बा’ आणि दोघांनाही मिळतो ‘सुर्यवंशी’ तेव्हा केवळ आतषबाजीची अपेक्षा नाही तर २७ मार्चला ब्लास्ट होणार असल्याचा आशय अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिलाय.

The desi Avengers of the Cop universe!When ‘Singham’ meets ‘Simmba’ meets #Sooryavanshi,expect not just fireworks but a full-blown blast on 27th March,2020☄️@ajaydevgn @RanveerOfficial #KatrinaKaif #RohitShetty @karanjohar @RelianceEnt @RSPicturez @DharmaMovies #CapeofGoodFilms pic.twitter.com/yvezDbJPFg

— Akshay Kumar (@akshaykumar) October 10, 2019

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)