चिंबळी – भरधाव वेगातील एसटी बसने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे शुक्रवारी (दि. 20) दुपारी घडली.
सविता मुर्गाप्पा तुळजानवर (वय 34, रा. मोशी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सोपान बाळकृष्ण पाटील (रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) या एसटी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील बाळासाहेब घुगरे (वय 29, रा. राजमुद्रा सोसायटी, धनकवडी, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.